सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. नेहा कोळंबकर, सौ. यशश्री चव्हाण यांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान
कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मालवण : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानबद्दल राज्य शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार मालवण मधील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. नेहा गणेश कोळंबकर व सौ. यशश्री यशवंत चव्हाण यांना कोळंब सरपंच सौ. सिया रामचंद्र धुरी व उपसरपंच विजय भिवा नेमळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदरचा कार्यक्रम ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाला. महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्ग व ग्रा.पं.कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला.