Category सिंधुदुर्ग

विरण सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अटीतटीच्या निवडणूकीत भाजपची बाजी !

बाबा परबांच्या नेतृत्वाखाली विजय : अध्यक्षपदी रामदास पांजरी तर उपाध्यक्षपदी पंकज परब मालवण : मालवण तालुक्यातील विरण वि.का.स. सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने बाजी मारली आहे. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या…

मालवण आगारातून उद्यापासून मालवण – मुंबई एसटी बस सुरू

मालवण – रत्नागिरी बसच्या वेळेत बदल मालवण : मालवण एसटी आगारातून गेले काही महिने बंद असलेली मालवण – मुंबई बसफेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मालवण आगारातून ही बस सकाळी ८ वाजता सुटणार आहे. तर मुंबई येथून पहाटे ४ वाजता…

आचरा येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अवधूत हळदणकर

व्हाईस चेअरमन पदी संतोष मिराशी यांची निवड ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन आचरा : येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी अवधूत हळदणकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी संतोष मिराशी यांची निवड करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या आचरा…

मनसेच्या वतीने २१ मार्च रोजी किल्ले सिंधुदुर्गवर शिवजन्मोत्सव सोहळा

ढोल ताशांच्या गजरात भव्य मोटरसायकल रॅलीने साजरी होणार शिवजयंती मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या हस्ते शिवराजेश्वर मंदिरात महाराजांना अभिवादन कुणाल मांजरेकर मालवण : मनसेच्या वतीने तिथीप्रमाणे येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यात शिवजन्मोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

आ. वैभव नाईकांच्या वाढदिवसानिमित्त ३०० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया !

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची उपस्थिती २६ मार्चला पूर्व तपासणीचा मालवण ग्रामीण रुग्णालयात शुभारंभ ८, ९ व १० एप्रिल रोजी होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. आ. नाईक…

किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती संभाजीराजेंच्या “बलिदान मास” चा जनजागृती फलक

सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत आणि शिवप्रेमी नागरिकांचा उपक्रम छत्रपती संभाजी राजेंच्या बलिदान मासची आठवण करून देण्याचा प्रयत्न कुणाल मांजरेकर मालवण : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी औरंगजेबा समोर हार न मारता हसत हसत मृत्यू पत्करला. फाल्गुन शुद्ध…

भाजपच्या महिला आघाडी मालवण शहरअध्यक्ष पदी सौ. अन्वेशा आचरेकर

गवंडीवाडा बूथ अध्यक्षपदी दादा कोचरेकर यांची निवड मालवण : भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या मालवण शहर अध्यक्षपदी सौ. अन्वेशा अजित आचरेकर उर्फ चारुशीला सोनवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गवंडीवाडा बूथ अध्यक्षपदी दादा कोचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

निलेश राणेंच्या वाढदिनी बेरोजगार तरुणाईला “लॉटरी” ; ५४५ जणांना तात्काळ नोकरी

कुडाळ मधील रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६८३ जणांची उपस्थिती ; ३०० जणांना जॉबकार्ड्स कुणाल मांजरेकर कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिनी कोकणातील बेरोजगार तरुणाईला “लॉटरी” लागली आहे. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ मध्ये आयोजित…

मालवणात १०० घरेलू महिला कामगारांना किराणा साहित्य वाटप

माजी खा. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्ताने शहर भाजपाचा उपक्रम कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर भाजपच्या वतीने येथील भाजपा कार्यालयात शहरातील १०० महिला घरेलू कामगारांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.…

कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चाकडून निलेश राणेंचे अभिष्टचिंतन

कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने कुडाळ मध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने माजी खा. निलेश राणेंचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी कणकवली तालुका युवा मोर्चा…

error: Content is protected !!