किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती संभाजीराजेंच्या “बलिदान मास” चा जनजागृती फलक
सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत आणि शिवप्रेमी नागरिकांचा उपक्रम
छत्रपती संभाजी राजेंच्या बलिदान मासची आठवण करून देण्याचा प्रयत्न
कुणाल मांजरेकर
मालवण : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी औरंगजेबा समोर हार न मारता हसत हसत मृत्यू पत्करला. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या या काळात छत्रपती संभाजीराजेंची हाल हाल करून क्रूर हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या बलिदाना बाबत जनजागृती करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेकडून ३ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत बलिदान मास पाळला जात आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या कट्टर हिंदूत्वामुळेच आज हिंदूंची मंदिरे अबाधित आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी राजेंच्या बलिदान मासचे महत्व समस्त शिवप्रेमी आणि हिंदूंना समजावे, यासाठी येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिराबाहेर सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत आणि शिवप्रेमींच्या वतीने शुक्रवारी जनजागृती फलक लावण्यात आला.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या या कालखंडात छत्रपती संभाजी राजे यांची हाल हाल करून क्रूर हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब याने पकडून हाल हाल करून मारले. संभाजी महाराज यांना औरंगजेबाने धर्म परिवर्तनाचे आमिष देऊन जिवंत सोडण्याचे अभिवचन दिले होते. परंतु धर्मप्रेमी संभाजी महाराजांनी त्या आमिषाला धुडकावून धर्म रक्षणासाठी मृत्यू स्वीकारला. त्या बलिदानाचे उपकार समस्त हिंदु समाजावर आहेत. त्या क्षणी जर संभाजी महाराज यांनी धर्म सोडला असता, तर इतिहास वेगळा असला असता. आज आपण हिंदु म्हणून जगतोय, ते त्यांच्या महान त्यागामुळेच ! त्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या माध्यमातून यावर्षी कुडाळ शहरात जिजामाता चौक येथे ३ मार्च ते १ एप्रिल २०२२ या कालावधीत बलिदान मास पाळण्यात येत आहे.
त्यामुळे धर्मवीर बलिदान मासची जागरूकता वाढावी, सर्वांना त्याचे महत्व कळावे आणि हा बलिदान मास सर्व हिंदूंनी पाळावा, ही अपेक्षा आहे. आपला देव देश आणि आपली मंदिरे ही धर्मवीर श्री संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेल्या त्यागामुळे आहेत. हे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कळावे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी स्वखर्चाने शुक्रवारी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरा समोर या बालिदान मासचा जनजागृतीचा फलक लावला. यावेळी उपस्थित
शिवप्रेमी हार्दिक शिगले, शांती तोंडवळकर, कल्पिता जोशी, कृपा कोरगावकर, साक्षी मयेकर, दिव्या मंडलिक, स्नेहा धुरी, दिया पवार, अश्विनी आचरेकर आदी उपस्थित होते.