Category शिक्षण

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विश्वस्त विनोद कदम यांचे निधन

मालवण : येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम ( वय सुमारे ६५) यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले असून त्याच ठिकाणी सोमवारी सकाळी…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ८ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव

३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

डीएड कॉलेज मालवण येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मालवण : डीएड कॉलेज मालवण येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डीएड कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा. रमेश वळवी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. नितीन राणे, बार्टीचे…

भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे मुंबई विद्यापीठाची ‘आविष्कार-२०२६’ संशोधन अधिवेशन कार्यशाळा

१ व २ ऑगस्ट रोजी आयोजन : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधन समन्वयक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या ‘आविष्कार’ संशोधन अधिवेशन २०२६–२७ अनुषंगाने यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी…

एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. विशाल कुशे यांना पीएचडी प्रदान

एमिटी मुंबई विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. विशाल प्रमोद कुशे यांना नुकतीच एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई या विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली.…

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईला जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक, विभागीय स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद…

भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद शपथविधी सोहळा संपन्न

नव्या विद्यार्थी नेतृत्वाने स्वीकारली जबाबदारी सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत यशवंतराव भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी परिषद शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि संघभावना…

वृक्षमित्र लेखक प्रकाश काळे यांचे एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मालवण : प्रख्यात वृक्षमित्र लेखक प्रकाश काळे यांनी सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली. श्री. काळे यांनी सन २०१५ मध्ये या महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये नक्षत्रवनप्रमाणे वृक्षारोपण केले होते. “एक झाड…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे ८ ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’

जिल्हास्तरीय देशभक्ती कला महोत्सवाचे आयोजन ; देशभक्तीपर समूहगीत, समूहनृत्य, समूह नाट्य छटा, लघु नाट्य स्पर्धाचे आयोजन सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृतमूल्यांचा, देशभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल,…

वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात ; युवा नेते विशाल परब प्रेरणादायी उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि शिक्षकांच्या योगदानाचा झाला सन्मान वेंगुर्ला : कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला दहावी, बारावी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच…

मनसेच्या वतीने मालवण तालुक्यातील शाळांमध्ये वह्यावाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम… मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्याच्या वतीने पेंडूर आणि पोईप येथील शाळांमध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. मनसे नेते…

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची मोठी झेप ; ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

राज्यस्तरीय स्पर्धेत यश ; ११ जुलै रोजी अहमदाबाद येथे होणार राष्ट्रीय अंतिम फेरी सावंतवाडी : फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत…

error: Content is protected !!