Category बातम्या

सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा

अमेय देसाई यांच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयाला एअर बेड व नेबुलायझर मशीन मालवण : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मालवण शहरातील युवा व्यक्तिमत्त्व अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना अत्यावश्यक गरज असलेले दोन एअर…

सुरेश प्रभूंना विश्वासात न घेताच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा घाट ?

सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या माजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांनाच विश्वासात न घेतल्याने आश्चर्य  खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली “ही” प्रतिक्रिया !  कुणाल मांजरेकर  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या ९ ऑक्टोंबर रोजी होऊ घातले आहे. या उद्घाटनावरून…

पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या चळवळीस पुर्ण पाठिंबा : सुरेश प्रभू

मालवण : पर्यटन व्यवसायिक महासंघाने पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेली ही चळवळ जिल्ह्याला एक नवी दिशा देणारी असुन जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला या चळवळीत सहभागी करण्याचा महासंघाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य देण्यास आपण सदैव तत्पर…

हे गणराया … कोकणी माणसाला नैसर्गिक संकटापासून दूर कर !

माजी केंद्रीयमंत्री खा. सुरेश प्रभू यांचं गणराया चरणी साकडं कुणाल मांजरेकरमालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी मालवण मेढा येथील आपल्या निवासस्थानी दीड दिवसांच्या गणरायाचे भक्तिभावाने पूजन केलं. कोकणावर अलीकडे सातत्याने नैसर्गिक संकटे घाला घालत…

“कोकण मिरर” च्या आरती संग्रहाचं खा. सुरेश प्रभू, नगराध्यक्षांसह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह मनसे पदाधिकारी उपस्थित ; संग्राह्य पुस्तिकेचे मान्यवरांनी केले कौतुक मालवण : डिजिटल मीडिया क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या “कोकण मिरर” डिजिटल न्यूजच्या आरती संग्रहाचं प्रकाशन खा. सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी…

विमानातून येणाऱ्या फक्त ७५ प्रवाशांसाठी श्रेयवादाची लढाई का ?

मनसे नेते परशुराम उपरकरांचा भाजप- शिवसेनेला सवाल मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांकडे लक्ष देण्याचा सल्ला कणकवली (प्रतिनिधी) : चिपी विमानतळाच्या उदघाटना वरून केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे.…

कौतुकास्पद ! मुणगे गावचा सुपुत्र राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित!

मसुरे | झुंजार पेडणेकर देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि.प.पू.प्रा.केंद्रीय शाळा झोंबडी नं.१ शाळेचे पदवीधर शिक्षकश्री.सतिश पांडुरंग मुणगेकर यांना राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षिक आगाज ही आंतरराष्ट्रीय संस्था सामाजिक शैक्षाणिक पर्यावरण,…

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ले पर्यटकांना खुले !

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील होडी वाहतूकीस आजपासून सुरुवात होडी वाहतूक संघटनेने मानले आ. वैभव नाईकांचे विशेष आभार मालवण : राज्य शासनाने राज्यातील विविध स्मारके, ऐतिहासिक वास्तू सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी बोट वाहतुकीसह व विजयदुर्ग किल्ला नागरिक,…

थाटात रंगला “सिंधुदुर्ग राजा” चा आगमन सोहळा !

कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिंधुदुर्ग राजाचे थाटामाटात श्रीं च्या मंडपामध्ये आज आगमन झाले. पिंगुळी काळेपाणी ते म्हापसेकर तिठा, गवळदेव, कुडाळ पोलीस स्टेशन ह्या मार्गे भारतीय जनता पार्टीच्या पोस्ट ऑफिस…

“त्या” आरोग्य सेविकांनी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे मानले आभार

कणकवली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कमी केलेल्या २० आरोग्य सेविकांना राज्य शासनाने परत सेवेत घेण्यास मान्यता दिली आहे. या आरोग्य सेविका पूर्ववत आहे, त्याच पदावर आरोग्य सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा…

error: Content is protected !!