थाटात रंगला “सिंधुदुर्ग राजा” चा आगमन सोहळा !
कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिंधुदुर्ग राजाचे थाटामाटात श्रीं च्या मंडपामध्ये आज आगमन झाले. पिंगुळी काळेपाणी ते म्हापसेकर तिठा, गवळदेव, कुडाळ पोलीस स्टेशन ह्या मार्गे भारतीय जनता पार्टीच्या पोस्ट ऑफिस समोरील कार्यालयाबाहेर उभारण्यात आलेल्या प्रशस्त मंडपात सिंधुदुर्गच्या राजाचे आगमन झाले. सिंधुदुर्ग राजाच्या उत्सवाचे यंदा १२ वे वर्ष आहे.
यावेळी कुडाळचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पप्या तवटे, सुनिल बांदेकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, साईनाथ म्हाडदळकर, राजेश पडते, सोशल मीडिया जिल्हा संयोजक युवा मोर्चाचे राजवीर पाटील, राजा धुरी, प्रथमेश दळवी, भूषण राणे, तन्मय वालावकर, प्रसन्न गंगावणे, आनंद सूर्यवंशी, चिन्मय नेमळेकर, देवराज राणे, संदेश सुकळवाडकर, रवी पावसकर आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.