सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा

अमेय देसाई यांच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयाला एअर बेड व नेबुलायझर मशीन

मालवण : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मालवण शहरातील युवा व्यक्तिमत्त्व अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना अत्यावश्यक गरज असलेले दोन एअर बेड व नेबुलायझर (वाफेच्या) मशीन रविवारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. विशेष बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला तात्काळ एअर बेडवर उपचार सुरू करण्यात आले. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटपही अमेय देसाई यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, रोटरी क्लब अध्यक्ष उमेश सांगोडकर, राजा शंकरदास, उत्तम पेडणेकर, विद्याधर मेस्त्री, राजू कोवळे, मयू पारकर, वैभव मेस्त्री, तुषार मेस्त्री, विघ्नेश मांजरेकर, उमेश हर्डीकर दर्शन गावकर आदी उपस्थित होते. जास्त दिवस बेडवर ठेवून उपचार सुरू असलेल्या रुग्णांना एअर (हवा) भरलेले बेड उपयुक्त असतात. तर रुग्णालयात आवश्यक अश्या नेबुलायझर मशीनची ग्रामीण रुग्णालयास असलेली गरज लक्षात घेता ही वैद्यकीय उपचार साधने वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्याचे अमेय देसाई यांनी सांगितले.

रक्तदान चळवळ असो अथवा कोणतेही सामाजिक कार्य अमेय देसाई नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. कोरोना काळातही त्यांनी अखंड सेवाकार्य केले. त्याचीच दखल घेत विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा सन्मानही करण्यात आला. आज आपल्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयाची गरज ओळखून अमेय यांनी केलेल्या सेवा कार्याबाबत त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!