Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

चिवला बीच समूलबाग परिसरातील वीज समस्येला पूर्णविराम

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरची उभारणी; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण मालवण : चिवला बीच येथील समूलबाग परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या आता मार्गी लागली आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून…

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात; दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू!

दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर-कोल्हापूर-बेळगाव मुख्य मार्गावरील स्नेह रेसिडेन्सीसमोर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन परप्रांतीय तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीची समोरून येणाऱ्या मिनी टेम्पोला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ…

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा बंद पडणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपाने रुग्णांना मोठा दिलासा! सेवा खंडित करण्याच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाची तातडीने कार्यवाही थकीत देयके अदा करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ला, पेंडुरकट्टा आणि दोडामार्ग येथील रुग्णांना दिलासा डायलेसिस सेवा विनाखंड सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना सिंधुदुर्ग :…

देवबागच्या पर्यटन क्षेत्रात केदार झाड यांची नवी भरारी!

‘The Arabian Waves’ हॉटेलचा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दिमाखात शुभारंभ मालवण : मालवण तालुक्यातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रात आपल्या व्यावसायिक कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रतिथयश हॉटेल व्यावसायिक तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष केदार झाड यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करत…

आमदार निलेश राणे पुरस्कृत, कुडाळ शहर शिवसेनेच्या नरकासुर वध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेरूरच्या श्री देव कलेश्वर मित्रमंडळाने पटकावला प्रथम क्रमांक; केळबाई मित्रमंडळ द्वितीय, तर कुडाळ बाजारपेठ तृतीय कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या पुरस्कृत आणि कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित भव्य नरकासुर वध स्पर्धेला स्पर्धकांसह प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेनेच्या या उपक्रमात…

भुयारी गटार योजनेचा निधी अखर्चित ठेवण्यास महेश कांदळगावकर जबाबदार

नगरसेवक तपस्वी मयेकर यांचा कांदळगावकरांवर जोरदार पलटवार; वैभव नाईकांच्या पाठपुराव्यामुळेच साडेनऊ कोटींचा निधी मालवण : मालवण शहरातील भुयारी गटार योजनेसह विविध विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला मालवणमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद

भरडनाक्यावर बालकृष्णाच्या विविध रूपांनी जिंकली उपस्थितांची मने; हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचा भव्य उपक्रम लहान गटात अनुश्री मेस्त्री प्रथम; मोठ्या गटात गुरु तुळसकर आणि आरव यांनी पटकाविला प्रथम क्रमांक मालवण : भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि भगवान श्रीकृष्णांच्या आदर्श चरित्राची…

अवैध धंद्या विरोधात मालवण पोलिसांचा धडाका कायम ; धुरीवाड्यात धडक कारवाई

३ लाख ४५ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त मालवण : शहरातील धुरीवाडा परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात मालवण पोलिसांनी रात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला…

गोकुळच्या संघर्ष आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उतरणार मैदानात

जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती; जिल्ह्यातून सुमारे १५० पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार सिंधुदुर्ग : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोकुळ दूध संघासंदर्भात सुरू असलेल्या संघर्षाला आता सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या…

स्थानिक गणेशमूर्तिकारांना मिळणार संघटित बळ; ‘जय गणेश’ सेवा सहकारी संस्थेची स्थापना!

समीर वर्दम यांची अध्यक्षपदी निवड ; स्थानिक मातीच्या गणेशमूर्तींना ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा निर्धार मालवण : गणेशमूर्ती निर्मितीच्या पारंपरिक कलेचे जतन, संवर्धन आणि स्थानिक मूर्तिकारांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मालवण तालुक्यातील मूर्तिकार व कारागीर बांधवांनी…

error: Content is protected !!