महेश कांदळगावकर यांच्या आश्वासनानंतर कमलाकांत खोत यांचे बेमुदत उपोषण स्थगित
धुरीवाडा भागासह शहरातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी सामंज्यस्याने प्रयत्न करण्याची श्री. कांदळगावकर यांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरासह धुरीवाडा भागातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी धुरीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत यांनी सोमवारी पालिकेसमोर सुरु केलेले बेमुदत उपोषण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारी रात्री स्थगित केले. मोकाट गुरांचा त्रास कमी करण्यासाठी सामंजस्याने तोडगा काढण्याची ग्वाही श्री. कांदळगावकर यांनी दिली आहे.
मालवण शहरासह धुरीवाडा खोतमठ येथील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी कमलाकांत खोत यांनी सोमवारी सकाळ पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. या उपोषणाला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाई मांजरेकर, विनोद भोगांवकर आदींनी भेट देऊन पाठींबा दर्शवला होता. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सोमवारी रात्री त्यांची भेट घेऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी चर्चा केली.