मालवण शहर व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी उमेश नेरूरकर यांची सर्वानुमते फेरनिवड !
उपाध्यक्षपदी नाना पारकर, अशोक सावंत, कार्यवाहपदी रवी तळाशिलकर, सहकार्यवाह अभय कदम, कोषाध्यक्ष पदी गणेश प्रभुलकर आदींचीही बिनविरोध निवड
सदस्य पदांवर नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांना संधी ; वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारणी निवडणुकीचा निकाल जाहीर
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहर व्यापारी संघाच्या मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील पाच वर्षांसाठी सर्वानुमते नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी उमेश नेरूरकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी नाना पारकर, अशोक सावंत आणि सचिवपदी रवी तळाशिलकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. या कार्यकारणीत सदस्य म्हणून नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांची निवड झाली आहे.
मालवण व्यापारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी हनुमान मंदिर सभागृह, सोमवार पेठ मालवण येथे संपन्न झाली. या सभेत कार्यकारणीच्या निवडणूकीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये सर्व पदांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष – उमेश नेरूरकर, उपाध्यक्ष – दीपक उर्फ नाना पारकर, अशोक सावंत, कार्यवाह – रवींद्र तळाशीलकर, सहकार्यवाह- अभय कदम, कोषाध्यक्ष – गणेश प्रभुलकर यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून हर्षल बांदेकर, संदीप शिरोडकर, मंदार ओरसकर, अमोल केळूसकर, हरेश देऊलकर, शैलेश मालंडकर, सरदार ताजर, विजय चव्हाण, योगेश बिळवसकर, उमेश शिरोडकर, महेंद्र पारकर यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारणीत स्विकृत सदस्य म्हणून श्रीकृष्ण तारी, अरविंद ओटवणेकर, दिनेश मुंबरकर, हेमंत शिरपुटे तर कायम निमंत्रीत म्हणून प्रमोद ओरसकर, दशरथ कवटकर, नितीन तायशेटे, नितीन वाळके, विजय केनवडेकर, महेश अंधारी, गोविंद (आपा) चव्हाण, सुहास ओरसकर, विठ्ठल साळगावकर, सुनिल परूळेकर, पांडू करंजेकर, मुकेश बांवकर, राजा शंकरदास, मसूद मेमन, अरुण साईल आदींची निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद नेवाळकर यांनी दिली आहे.