आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या रत्नागिरीच्या खोखोपटू अपेक्षाचा निलेश राणे यांच्याहस्ते सत्कार

रत्नागिरी : गुवाहाटी आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारताच्या खो खो च्या मुलगे आणि मुलींच्या संघाने अंतिम फेरीत विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यातील मुलींच्या संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघात रत्नागिरीच्या खो खो पटू अपेक्षा सुतार हिचाही समावेश होता. स्पर्धेमध्ये अपेक्षाने उत्तम कामगिरी करत चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

यानिमित्त अपेक्षा हीचा रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी सत्कार करून तिच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी स्वाभिमान क्रीडा संघाचे अध्यक्ष सतेज नलावडे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!