मालवण शहरासह धुरीवाड्यातील मोकाट गुरांवर कारवाईसाठी कमलाकांत खोत यांचे बेमुदत उपोषण सुरु !

“त्या” जनावरांच्या मालकावर आक्षेप ; मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विरोधात नाराजी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरासह धुरीवाडा भागातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही याबाबत कारवाई होत नसल्याने धुरीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत यांनी सोमवार पासून पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. धुरीवाडा येथील नारायण तळाशीलकर यांच्या मालकीच्या जनावरांमुळे येथील रस्ताही खराब होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी श्री. खोत यांनी केली आहे. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांकडून याप्रश्नी दुर्लक्ष होत असल्या बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या उपोषणाला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाई मांजरेकर, विनोद भोगांवकर आदींनी भेट देऊन पाठींबा दर्शवला.

कमलाकांत खोत यांच्यासह धुरीवाडा येथील नागरिक यांनी यापूर्वी अनेक वेळा मालवण पालिका प्रशासनास निवेदन देत मोकाट गुरांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र याबाबत पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. धुरीवाडा येथील नारायण तळाशीलकर यांच्या मोकाट गुरांमुळे येथे पालिकेने नव्याने बनवलेला रस्ता शेणाने खराब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करता अनेकवेळा ते कार्यालयात उपस्थित नसतात, असे सांगून मोकाट गुरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. दिवसभरात अनेकांनी त्यांना भेटून उपोषणाला पाठींबा दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!