आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली – मालडी विभागात शैक्षणिक साहित्य वाटप

उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्या वतीने उपक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली माडली विभागामध्ये शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्या वतीने विभागातील जिल्हापरिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी विभाग प्रमूख दीपक उर्फ बंडू चव्हाण, उपविभागप्रमुख अमित फोंडके, अंबाजी सावंत, किर्लोस माजी सरपंच प्रदीप सावंत, माजी उपसरपंच दीपक किर्लोस्कर, किर्लोस शाखा प्रमुख विकास लाड, उपसरपंच अजित लाड, चेअरमन स्वानंद भावे, रामगड सरपंच शुभम मटकर, माजी सरपंच विलास घाडीगांवकर, युवासेना शाखा प्रमुख गणेश पराडकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. उल्का उल्लास तारी, सौ. लक्षित मेथर, सौ. स्वानंदी सदाशिव साध्ये
असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, माजी सरपंच रामचंद्र राऊत, ओवळीये शाखा प्रमुख अप्पी परब, श्रावण शाखा प्रमुख स्वप्निल दळवी, दुलाजी परब, राठीवडे उपसरपंच स्वप्नील पुजारे, सुभाष धुरी, शाखा प्रमुख संतोष धुरी, आडवली सरपंच श्री. आडवलकर, उपसरपंच सौ. सोनाली पराडकर, शाखा प्रमुख दीपक घाडी, हिवाळे युवासेना अध्यक्ष गीतेश खेडेकर, असरोंडी शाखा प्रमूख सुनील सावंत आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!