आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारपेठ येथे २७ रोजी जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा

शिवसेना पदाधिकारी, युवा कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या उद्या होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडकर मैदान विरण बाजारपेठ येथे सोमवारी २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांच्या वतीने ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला ७ हजार रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला ४ हजार रुपये व चषक दिला जाणार आहे. स्पर्धेतील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी २००० रुपये तर पाच ते आठ क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी २५० रुपये असून इच्छुक संघानी सागर नार्वेकर – ९४२०८३२००३, जयवंत पांजरी – ९३२६६१२८६५, तन्मय आंबेरकर – ८२९१८८१६३८, चेतन सावंत – ९३७३२१३०२१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!