आदित्य ठाकरेंना आणून माणगांव खोऱ्यात “डॅमेज कंट्रोल” चा उबाठाचा प्रयत्न फसला ; दत्ता सामंतांचे धक्के सुरूच

माणगांव खोऱ्यात एका रात्रीत उबाठा शिवसेनेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सहा ठिकाणी धक्के

भावनेचे राजकारण करून विकासाकडे दुर्लक्ष करण्याचे दिवस आता संपले, निलेश राणे यांना माणगांव खोऱ्यातून किमान ९० % मते मिळणार : दत्ता सामंत

कुडाळ | कुणाल मांजरेकर

उबाठा शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्याला विकासात्मक कामांच्या बळावर मागील लोकसभा निवडणुकीत सुरुंग लावण्यात यश मिळवलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी देखील जोरदार धक्के दिले आहेत. त्यामुळे निदान विधानसभा निवडणुकीत तरी आपला गड ताब्यात ठेवण्यासाठी उबाठा शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौऱ्या याठिकाणी नुकताच आयोजित करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर देखील दत्ता सामंत यांचा झंझावात कायम असून सोमवारच्या रात्री दत्ता सामंत यांनी माणगांव खोऱ्यात तब्बत सहा ठिकाणी उबाठाला धक्के दिले आहेत. विकासाचे प्रश्न बाजूला ठेवून भावनेचे राजकारण करून मते मिळवण्याचे दिवस आता संपले असून येथील मतदार विकासाच्या दिशेने आले आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना माणगांव खोऱ्यातून किमान ९० % मते मिळतील, असा विश्वास यानिमित्ताने दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे हा भाग गेली काही वर्षे उबाठा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या भागातील ७० टक्के हुन अधिक मतदान उबाठा शिवसेनेच्या आमदार, खासदारांना होत होते. मात्र गेली दहा वर्षे या भागाचा कोणताही विकास करण्यात उबाठा शिवसेनेच्या आमदार, खासदारांना अपयश आले. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उबाठाच्या या बालेकिल्ल्याला जोरदार भगदाड पाडले. या ठिकाणी मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लावल्याने लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीचे उमेदवार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी हा झंझावात कायम ठेवल्याने माणगाव खोऱ्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उबाठा शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेे यांची जाहीर सभा दोन दिवसापूर्वी या ठिकाणी ठेवली. मात्र या सभेनंतरही माणगाव खोऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झंझावात कायम राहिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोमवारी रात्री या भागात तब्बल सहा ठिकाणी उबाठा शिवसेनेला धक्के दिले आहेत. यात गोसावीवाडी, वाडोस, माणगांव लाडवाडी, दुकानवाड यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.

वाडोस मध्ये आदेश गवस, नामदेव धुरी, मेघनाथ म्हाडगुत, लक्ष्मी घोंगळे, रामचंद्र पंथारे, शंकर कदम, संतोष कदम, संतोष परब, रामचंद्र परब, उमेश म्हाडगुत, रामकृष्ण म्हाडगुत, भगवान सावंत, किरण म्हाडगुत, राजन म्हाडेश्वर, महेंद्र म्हाडगुत, सुनील म्हाडगुत, ओंकार वाळके, सयाजी कदम, अवधूत धुरी, सयाजी कदम, लक्ष्मी भांबळे, मुकेश म्हाडगुत, सुभाष मेस्त्री, अरुण चिले, तुषार घोगळे, नारायण गवस, प्रतीक म्हाडगुत, सुचिता कदम, अनिल म्हाडगुत, स्वरूप परब, सौरभ भालेकर, प्रकाश कदम यांनी प्रवेश केला. तर गोसावीवाडीमध्ये  मनोहर गोसावी, प्रकाश गोसावी, बबन गोसावी, आनंद गोसावी, चंद्रकांत गोसावी, सिताराम गोसावी, जनार्दन गोसावी, कृष्णा गोसावी, लक्ष्मण गोसावी, बाबलीनाथ गोसावी, दत्तगुरु गावडे, प्रकाश मोर्ये, राजन मोर्ये, ज्ञानेश्वर मोर्ये, मंगेश मोर्ये, पुंडलिक मोर्ये, आबा गोसावी, दशरथ रेमुळकर, प्रथमेश राऊळ, महेश मोर्ये, बाळा सावंत आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. माणगांव लाड वाडी मध्ये देखील शेकडोंच्या संख्येने उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, आनंद शिरवलकर यांच्यासह शिवसेना आणी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!