आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी मालवणात विविध उपक्रम

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ, मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त रविवारी २६ जानेवारी रोजी मालवण शहारामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. यात सकाळी ११ वाजता शहरातील महावितरण मधील वायरमन, लाईनमन यांचा सत्कार शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम दुपारी ३.००. वाजता शिवसेना शाखा मालवण येथे होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महीला आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी,महीला तालुकाप्रमुख सौ. श्वेता सावंत, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख सौ. शिल्पा खोत, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, मंदार ओरसकर, निनाक्षी शिंदे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!