कट्टा येथे उद्यापासून टेनिसबॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ; हजारोंची बक्षिसे…

ॲड. रूपेश परुळेकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

कट्टा येथील ॲड. रूपेश परुळेकर मित्रमंडळाच्यावतीने २४ ते २६ मार्च रोजी टेनिसबॉल अंडरआर्म (बॉक्स नाईट) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत “एक गाव एक ग्रामपंचायत एक संघ” या नुसार संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रू. १०५५५/- व आकर्षक चषक आणि मेडल तर द्वितीय पारितोषिक रू. ६५५५/- व आकर्षक चषक आणि मेडल देण्यात येणार असून स्पर्धेत इतर आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी ७००/- रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. ही क्रिकेट स्पर्धा ॲड. रूपेश परुळेकर फिटनेस सेंटर जवळ, मालवण कसाल रोड कुसरवे येथे संध्याकाळी ठीक ६ वाजता चालू होणार आहे. तरी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी राहुल चव्हाण :- ९४२०८२२५०७ निलेश बांदिवडेकर : – ९५९८५१०८९९ देवेन भोगटे – ८८३०२०९५६७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!