चिवला बीच येथील हायमास्ट टॉवर अखेर सुस्थितीत !

दीपक पाटकर यांच्या पुढाकाराने धोकादायक बॉक्स अखेर बदलला ; पाटकर यांनी प्रशासनाचे मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील चिवला बीच येथील हायमास्ट टॉवरचा मागील वर्षभर जीर्ण बनलेला बॉक्स माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून पालिकेच्या वतीने बदलण्यात आला आहे. सदरील बॉक्स गंजून गेल्याने तो धोकादायक बनला होता.

चिवला बीच येथील या हायमास्ट टॉवरचा बॉक्स जीर्ण बनल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मागील वर्षभर हा बॉक्स बदलण्याची मागणी येथील नागरिक करीत होते. याबाबत येथील नागरिकांनी भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर श्री. पाटकर यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हा बॉक्स बदलण्यात आला आहे. श्री. पाटकर यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जॉन्सन रोड्रिक्स, राज कांदळकर, आनंद मयेकर, सुभाष कुमठेकर, प्रणाली कांदळकर, प्रशांत कांदळकर, अमोल परब, पावलू सोज, कैतान सोज, अंतोंन फर्नांडिस आदी उपस्थित होते. या कामाची पूर्तता झाल्याबद्दल नागरिकांनी दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3584

Leave a Reply

error: Content is protected !!