दानिश इलेव्हन देवबाग संघ ठरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषकाचा मानकरी !

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढतीत उमेश इलेव्हन संघाचा केला पराभव

विजेत्या देवबाग संघाला ३ लाख ४८ रुपये, चषक तर उपविजेत्या हुंबरठ संघाला १ लाख ५० हजार ६९ रुपये चषक चषक प्रदान

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर झालेल्या “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक” डे नाईट क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढतीत दानिश इलेव्हन देवबाग संघाने उमेश इलेव्हन हुंबरठ संघाचा पराभव करून स्पर्धेतील विजेतेपदाचा बहुमान मिळवला. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यासाठी क्रीडा रसिकांनी बोर्डिंग मैदानावर एकच गर्दी केली होती. विजेत्या दानिश इलेव्हन संघाला ३ लाख ४८ रुपये आणि चषक तर उपविजेत्या उमेश इलेव्हन हुंबरठ संघाला १ लाख ५० हजार ०६९ रुपये व चषक देण्यात आला.

स्पर्धेतील उपविजेत्या संघाला पारितोषिक सुपूर्द करताना

टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर १५ ते १९ मार्च या कालावधीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत राज्यासह देशातील विविध ठिकाणच्या नामांकित क्रिकेटपट्टूंचा सहभाग असलेले ३२ संघ सहभागी झाले होते. रविवारी रात्री झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दानिश इलेव्हन संघाने रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाचा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात उमेश इलेव्हन हुंबरठ संघाने ओम साई म्हापण संघाचा एकतर्फी पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकतर्फी झाल्याने प्रेक्षकांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला. मात्र उमेश इलेव्हन हुंबरठ विरुद्ध दानिश इलेव्हन देवबाग या दोन मातब्बर संघामध्ये झालेली अंतिम लढत अटीतटीची झाल्याने उपस्थित क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. उमेश इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना उमेश इलेव्हन संघाने ६ षटकात ४ बाद ६७ धावा जमवल्या. यामध्ये अनुराग मोहिते याने ११ धावात २७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरा दाखल खेळणाऱ्या दानिश इलेव्हन संघाने संयमी आणि तेवढीच आक्रमक खेळी केली. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला. अखेर दोन चेंडू बाकी ठेवून देवबाग संघाने स्पर्धेवर विजयाची मोहोर उमटवली. ५.४ षटकात देवबाग संघाने ३ बाद ६९ धावा जमवत स्पर्धेचे विजेतेपद पटकवले. भूषण गोळे याने ३६ धावांची वादळी खेळी केली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, युवा नेते संदेश पारकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाला पारितोषिक वितरण करण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – अमित तांबे (उमेश इलेव्हन) यष्टीरक्षक – सुनील पालयेकर (ओम साई म्हापण), फलंदाज – संदीप पाटील (दानिश इलेव्हन), उत्कृष्ट गोलंदाज – समीर वेंगुर्लेकर (दानिश इलेव्हन) मालिकावीर – सचिन बर्गे (दानिश इलेव्हन). या सर्वांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महेश कांदळगांवकर, यतीन खोत, भाई कासवकर, अवधूत मालंडकर, अमित भोगले, उमेश मांजरेकर, सौ. शिल्पा खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, सिया धुरी, दीपा शिंदे, अंजना सामंत, नंदू गवंडी, सन्मेश परब, भगवान लुडबे, मनोज मोंडकर, बाबा सावंत, पंकज वर्दम, सिद्धार्थ जाधव, आशु मयेकर, रणजित परब, समीर लब्दे, पिंट्या गावकर, तपस्वी मयेकर, सिद्देश मांजरेकर, करण खडपे, राका रोगे, अन्वय प्रभू, राहुल परब यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि क्रिकेटप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!