ज्यांच दुकानच भंगारात विकलं गेलंय, त्यातल्या कामगारांनी निलेश राणेच्या विजयाची चिंता करू नये ….
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची खा. विनायक राऊत यांच्यावर बोचरी टीका
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टीच्या जीवावर ज्यानी खासदारकीचं पाऊल टाकलं, त्यांनी स्वतःची चिंता करावी. निलेश राणेना निवडून देण्यासाठी जनता आसूसलेली आहे. ज्यांनी कुचकामी खासदार पहिला, ती त्रस्त जनता तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवते आहे, पुढेही शिकविल. उगाच नसलेलं अवसान खासदार विनायक राऊत यांनी आणू नये. आधी निलेश राणे यांच्यासमोर उभं कोणाला करणार ते सांगा ? असा सवाल भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केला आहे.
खा. राऊत यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्यावर केलेल्या टिकेचा धोंडू चिंदरकर यांनी समाचार घेतला आहे. वैभव नाईक यांना संपवण्याचं काम विनायक राऊत यांनी सुरु केलेलं आहे. ते इथल्या उबाठा गटातील कार्यकर्त्यांना माहित झालं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी. तुमचं दुकान भंगारात गेलं आणि कोणाच्या जीवावर निलेश राणेना आपटण्याचं स्वप्न बघता ? राऊत साहेब स्वतःची राजकीय काळजी घ्या. निलेशजी राणे आमदार होणे ही औपचरिकता राहिली आहे. इथल्या जनतेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही काळजी नका करू. तुमचं पार्सल सहव्याज परत मुंबईत पाठवण्यास भाजप सक्षम असं, असंही धोंडू चिंदरकर यांनी म्हटलं आहे.