१५ मार्चपासून मालवणात “उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचा थरार…
भव्य मोटारसायकल रॅलीने होणार वातावरण निर्मिती : खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्यासह दिग्गज होणार सहभागी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १५ ते १९ मार्च या कालावधीत येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक ” क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी वातावरण निर्मिती म्हणून १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता देऊळवाडा ते बाजारपेठ मार्गे बोर्डिंग मैदाना पर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, मुंबईचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर, युवासेनेचे सुशांत नाईक, मंदार शिरसाट, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, उमेश मांजरेकर, निनाक्षी मेथर, किशोर गावकर, अक्षय रेवंडकर, अक्षय वालावलकर, उमेश चव्हाण, यतीन खोत, अंबाजी सावंत आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, मालवण तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेच्या बक्षिसाची क्रिकेट स्पर्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा युट्युबच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून नामांकित संघ आणि नामांकित खेळाडूंचा खेळ यानिमित्ताने रसिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबत प्रत्येक क्रिकेट प्रेमी उत्सुक असल्याचे दिसून येते. या स्पर्धेच्या नियोजनासाठी मंदार केणी, मंदार ओरसकर, बाबी जोगी, पुनम चव्हाण, सेजल परब, शिल्पा खोत, निनाक्षी मेथर, नंदू गवंडी, नितीन वाळके, सिद्धेश मांजरेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
व्हीआयपी प्रेक्षक गॅलरी !
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे मालवण वासीयाना औत्सुक्य आहे. डे नाईट स्वरूपात होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये नियमित प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्यांसाठी व्हिआयपी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येत आहे. ही सुविधा सशुल्क असून पाच दिवसांसाठी केवळ ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या रकमेत संबंधित प्रेक्षकांसाठी त्यांची जागा आरक्षित केली जाणार आहे. याशिवाय स्पर्धेच्या ठिकाणी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार असून बचत गट आणि स्थानिक व्यावसायिकांना नाममात्र दरात हे स्टॉल्स मिळतील. तरी प्रेक्षक गॅलरी आणि स्टॉलसाठी मंदार केणी 09637778901, 09860925858 यांच्या शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.