डेरवण येथील टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या आर्या दिघेचे तिहेरी यश

प्राची चव्हाण, दुर्वा चिपकर, गणेश चव्हाण यांनाही विविध पदके

मालवण | कुणाल मांजरेकर

श्री विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवणच्या वतीने घेण्यात आलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या दिघेने सुवर्णपदक तर प्राची चव्हाणने रजत पदक पटकाविले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुर्वा चिपकरने कांस्य तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात गणेश चव्हाणने कांस्य पदक मिळविले.

या स्पर्धेत आर्या दिघे हिने १३ आणि १७ वर्षांखालील गटातही रजत पदकावर मोहोर उमटविताना आपल्या चतुरस्त्र खेळाची झलक दाखवून सर्वांची वाहवा मिळवली. याशिवाय प्रज्वल नामनाईक, सई कांबळी यांनी उपांत्य फेरीत तर वीरा वारंग, वर्षा परुळेकर, आधिष पेडणेकर, प्रत्युष शेट्टीगार, दीक्षांत शिवापूरकर, लौकिक तळवडेकर यांनी उपांत्य पूर्व फेरीमध्ये मजल मारली. ही सर्व मुले विष्णू कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण टेबल टेनिस अकॅडमी मध्ये सराव करतात. सहभागी आणि यशस्वी स्पर्धकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!