महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड ; विद्यार्थ्यांकडून युवकाला योग्य ती “समज”

मालवणात अशा घटना खपवून घेणार नाही ; भाजपा युवा मोर्चाच्या गौरव लुडबे यांचा इशारा

मालवण : तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका युवतीची परिसरातीलच एका युवकाकडून छेडछाड काढल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याला योग्य त्या भाषेत समज दिली. या घटनेनंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. या घटनेची जोरदार चर्चा शहरात सुरु होती. दरम्यान, मालवण तालुक्यात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून संबंधिताना चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशारा युवा मोर्चाचे कार्यकर्ते गौरव लुडबे यांनी दिला आहे.

गौरव लुडबे, भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते

सदरची घटना शनिवारी सकाळी घडल्यावर सदरील विद्यार्थिनीच्या मित्रपरिवाराने याची गंभीर दखल घेत युवा मोर्चाचे कार्यकर्ते गौरव लुडबे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर त्या युवकाचा शोध घेऊन त्याला योग्य त्या भाषेत समज देण्यात आली. ह प्रकरण पोलीस ठाण्यातही गेले होते. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मालवणात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. भाजपा युवा मोर्चा संबंधिताना योग्य तो धडा शिकवेल, असा इशारा गौरव लुडबे यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!