ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून सावरवाड तिठा ते वराड गावापर्यंतच्या रस्त्यासाठी ३.८० कोटी मंजूर !
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ५८ लाख निधीतूनही गावातील विविध विकासाची कामे मंजूर
भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांचा विशेष पाठपुरावा : राजन माणगावकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील युती सरकारच्या माध्यमातून वराड गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जि. प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी विशेष पाठपुरावा केल्याची माहिती वराड पंचायत समितीचे भाजप शक्तीकेंद्र प्रमुख राजन माणगांवकर यांनी दिली आहे.
सावरवाड तिठा ते वराड गावाकडे येणाऱ्या रस्त्यासाठी ३ कोटी ८० लाख रुपये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहेत. प्रशासकीय मंजुरी अंती हे काम मार्गी लागेल. यासह माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून संतोष साटविलकर व गावातील भाजप पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत वराड गावात ५८ लाख निधीतील कामे मंजूर झाली आहेत. यात वराड हायस्कुल ते म्हाळुंगेवाडी जाणारा रस्ता, वराड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता, वराड पालववाडी ते विजय पालव घराकडे जाणारा रस्ता, वराड भंडारवाडी ते वाउळवाडी रस्ता, वराड शेटयेवाडी स्मशानभूमी व वराड तलावनजीक निवाराशेड नूतनीकरण, वराड वाउळवाडी ट्रान्सफॉर्मर आदि कामे मंजूर आहेत, अशी माहिती माणगावकर यांनी दिली.