जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मालवणात होणार जिल्ह्यातील पहिली महिला मॅरेथॉन !

७ मार्च रोजी महिलांसाठी “रन फॉर हेल्थ” चे आयोजन ; ग्लोबल रक्तदाते, ग्लोबल रक्तविरांगणा मालवणचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण मध्ये जिल्ह्यातील पहिली महिलांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने मंगळवारी ७ मार्च रोजी सकाळी ७.३० ते ९ यावेळेत देऊळवाडा ते कोळंब पूल सागरी महामार्गावर दोन किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा होणार आहे.

चला धावूया, रक्तदान जनजागृती साठी… चला धावूया प्लास्टिक मुक्ती साठी… चल सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी… अशी थीम घेऊन ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून तीन गटामध्ये होणार आहे. यात १६ ते ३० वर्षे वयोगट (२ किमी), ३१ ते ४५ वर्षे वयोगट (२ किमी), आणि
४६ ते ६० वर्षे वयोगट (एक कि. मी. चालणे) अशा प्रकारे स्पर्धा होतील. देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पुल सागरी महामार्ग असे एकूण २ किलोमीटर अंतर या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पार करायचे आहे. पहिले दोन गट रनिंग व तिसरा गट (४५ ते ६० वर्षे ) या वयोगटातील महिलांसाठी मिनी वॉक स्पर्धा असे या स्पर्धेचे स्वरूप असेल.

सहभागी स्पर्धकानी स्वतःच्या जबाबदारीवर स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि स्पर्धे दरम्यान मोल्यवान वस्तू परिधान करून येऊ नये. आपली कुठलीही वस्तू हरवल्यास त्यास आयोजक जबाबदार नसतील. स्पर्धेतील प्रथम विजेत्या चार क्रमांकांना आकर्षक चषक, मेडल आणि सन्मानपत्र स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. तर सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल दिले जाईल. स्पर्धेसाठी नियम व अटी असून अधिक माहिती आणि नावनोंदणी साठी सौ. राधा केरकर 9021163580, सौ. नेहा कोळंबकर 9404920366, सौ. समृध्दी धुरी 9420437657, सौ. अनुष्का चव्हाण 9404546337, सौ. वैशाली शंकरदास 9422392948, सौ. कोमल चव्हाण 8600373178 यांच्याशी संपर्क साधावा. सर्व महिला ग्रुप, कॉलेज ग्रुप, सामाजिक संस्था, महिला बचत गट, सर्व महिला खेळाडू, सर्व माजी शालेय महिला ग्रुप यांनी, मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन ग्लोबल रक्तवीरांगना मालवण, ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!