मालवणच्या बोर्डिंग ग्राऊंडवर रंगणार “मालवण प्रिमिअर लीग” चा थरार…

मालवण स्पोर्ट्स क्लबचे आयोजन ; लिलाव पद्धतीने संघ निवड प्रक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने २६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर मालवण प्रीमियर लीग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा (पर्व पाचवे) आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या संघाला ५५,५५५ रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला ३३,३३३ रुपये व चषक दिला जाणार आहे.

या स्पर्धेसाठी संघनिवड प्रक्रिया लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी प्रवेश अर्ज भरायचे आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून प्रवेश अर्ज भरायची अंतिम तारीख १२ मार्च आहे. प्रवेश अर्ज मॉन्जिनीस केक शॉप भरड येथे उपलब्ध आहेत. तरी अधिक माहितीसाठी गौरव लुडबे 9420890110 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3595

Leave a Reply

error: Content is protected !!