भाजपा चषक २०२३ साठी “आयपीएल” च्या धर्तीवर मेगा लिलाव प्रक्रिया

कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात लिलाव संपन्न ; भाजपा युवा मोर्चाचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा युवा मोर्चा मालवणच्या वतीने ११ आणि १२ मार्च रोजी कट्टा काराणेवाडी येथे आयोजित भाजपा चषक २०२३ या डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी प्रक्रिया बुधवारी ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे घेण्यात आली. आयपीएलच्या धर्तीवर झालेल्या या लिलावासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मालवण तालुक्यातील खेळाडूसाठी अशा प्रकारची डे नाईट स्वरूपाची स्पर्धा आयोजित केल्या बद्दल बाबा परब यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. आपण स्वतः जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असतो. त्यामुळे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किती कष्ट असतात हे माझ्याशिवाय दुसरा कोण समजू शकत नाही. असे देखील आवर्जून त्यांनी सांगितले. माजी सभापती संतोष साटविलकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना हा एवढा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा सोहळा प्रथमच आपल्या मतदार संघात होत असल्याने याचे वेगळे समाधान माझ्या मनात आहे. जेवढे शक्य होईल तेवढे माझे योगदान या स्पर्धेस देण्याचा मी प्रयत्न करेन असे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, सरपंच शेखर पेणकर, दिपा सावंत, मामा माड्ये, जगदीश चव्हाण, शेखर मसुरकर, आशिष हडकर, बबन पांचाळ, सागर माळवदे, सुशिल गावडे, समिर रावले, अमित सावंत, प्रवीण मिठबांवकर, प्रदीप मिठबावकर, सुहास कुबल, अवधूत डगरे, मंगेश माडये तसेच सर्व सहभागी संघाचे संघमालक, कर्णधार व इतर आयोजक मंडळ भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप देऊलकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3595

Leave a Reply

error: Content is protected !!