महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान योजनेंतर्गत मालवण शहरासाठी ६.५२ कोटींचा निधी
३१ विकास कामे लागणार मार्गी ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे शहर भाजपाने मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान योजना २०२२-२३ अंतर्गत माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत जिल्हा नियोजन कडून मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाखाचा निधी मंजूर करून घेतल्याची माहिती भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली आहे.
यामध्ये मोरेश्वर व्हाळी वायरी येथे संरक्षक भिंत बांधणे ४० लाख, भरड ते तारकर्ली मुख्य रस्ता नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ७० लाख, रांगोळी महाराज मठ ते लिलाव सेंटर कडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे ३५ लाख, आशा पार्क येथील ईएसआर भोवती कंपाउंड भिंत बांधणे व परिसर विकसित करणे २० लाख, मेढा मुरलीधर मंदिर ते रोझरी चर्च जंक्शन रस्ता डांबरीकरण करणे २० भरड, मेढा काळबादेवी- रामगल्ली काँक्रिटीकरण व मजबुतीकरण करणे २० लाख, मेढा काळबादेवी येथील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराचे बांधकाम करणे २० लाख, वायरी अंबाजी हायस्कूल जवळ मेस्त्री वाडी येथील परुळेकर घरापर्यंत आरसीसी गटार व काँक्रीट रस्ता बांधकाम करणे ३० लाख, फोवकांडा पिंपळ, नगरपरिषद पर्यटन सुविधा केंद्र समोरील रस्ता डांबरीकरण करणे १८ लाख, मालवण नगरपरिषद हद्दीतील श्री रामेश्वर मंदिर ते सातेरी मंदिरकडे जाणाऱ्या पुलाचे नूतनीकरण करणे १५ लाख, रेवतळे परब हद्दीलगत नाल्यास आधार भिंत बांधणे व नवीन रस्ता तयार करणे ३५ लाख, रेवतळे फाटक शाळा ते मांजरेकर घर ते चंडिका मांड रस्त्यापर्यंत गटार बांधणे २२ लाख, धुरीवाडा साळस्कर घर ते गारुडेश्वर मंदिरापर्यंत नवीन रस्ता तयार करणे २० लाख, मालवण नगरपरिषद हद्दीतील देऊळवाडा स्मशानभूमी नूतनीकरण करणे व शेड बांधकाम करणे २० लाख, देऊळवाडा आडवण येथील मायनर ब्रिज बांधणे ४५ लाख, बाजारपेठ संत सेना मार्ग भैरवी मंदिर ते कासारवाडी गटार रस्ता काँक्रिटीकरण करणे व पेवर ब्लॉक बसवणे १५ लाख, दांडी मोरेश्वर स्मशानभूमी सुशोभीकरण करणे १० लाख,दांडी मोरेश्वर रांज ते मोरेश्वर स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे २० लाख, भरड नाका ते हडकर मार्ग रस्ता डांबरीकरण करणे २५ लाख, इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद रस्ता डांबरीकरण करणे १० लाख , धुरीवाडा साई मंदिर रोड ते पडवळ घर ते काजरोबा मंदिर कन्याशाळा रस्ता डांबरीकरण करणे व गटार मजबुतीकरण करणे २० लाख, मेढा भाऊ केळुस्कर घर ते राजकोट बबन मिटकर घर पाणंद कॉंक्रिटीकरण करून आधार भिंत बांधणे ५ लाख, वायरी शिवनेरी चौक ते गर्देरोड रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, वायरी तारकर्ली ते गावकरवाडा उर्वरित रस्त्याचे करविंग व रस्त्याचे डांबरीकरण करणे १० लाख, गवंडीवाडा कल्पतरू रस्ता ते मच्छी मार्केट कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे २० लाख, जुनी स्टेट बँक कॉर्नर ते दैवज्ञ भवन रस्त्यास गटार बांधकाम करणे १५ लाख, मालवण नगरपरिषद हद्दीतील देऊळवाडा येथील शांतीसागर मैदान विकसित करणे १० लाख, आदर्श नगर ते कोळगे घरा कडील रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख,आडारी घनकचरा केंद्र ते मालवणकर घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, मेढा रासम गल्ली डांबरीकरण करणे १५ लाख आणि आडवण येथील गोवेकर घराकडे जाणाऱ्या मायनर ब्रिज कम मोरीचे बांधकाम करणे ७ लाख या कामांचा समावेश आहे.
या कामांच्या मंजुरी बद्दल भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पालकमंत्री रविद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.