निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यात नवीन ४ जिओ टॉवर मंजूर

डिकवल, त्रिंबक, कुमामे, चिंदर भटवाडी गावात उभे होणार जिओ टॉवर

मालवण : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात नव्याने चार जिओ टॉवर मंजूर झाले आहेत. यामध्ये डिकवल, त्रिंबक, कुमामे व चिंदर भटवाडी या गावांचा समावेश आहे. ही गावे जिओ नेटवर्कशी जोडली जाणार आहेत.

कुडाळ व मालवण तालुक्याच्या डोंगरी भागातील अनेक गाव हे आऊट ऑफ कव्हरेज आहेत. अलीकडेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १०३ BSNL टॉवर मंजूर झाले होते. त्याच बरोबर कुडाळ व मालवण तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावात जिओ टॉवर साठी निलेश राणे यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यातीलच ४ गावातील टॉवरसाठी मंजुरी मिळाली असून इतर टॉवरही प्रस्तावित आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!