भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मालवण : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी त्यांच्या डोंबिवली पलावा सिटी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, मालवण शहर मंडल प्रभारी संतोष गावकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.