मालवण टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर १५ फेब्रुवारी पासून रंगणार “क्रिकेटचा महासंग्राम”

लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार उधळण ; ४ कॅमेऱ्यांद्वारे प्रेक्षकांना लाईव्ह स्वरूपात पाहता येणारी पहिली स्पर्धा 

“कोकण नाऊ”तर्फे सलग तिसऱ्या वर्षी ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित “कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३” 

मालवण : येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर १५ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान “कोकण नाऊ” चॅनेलच्या वतीने यावर्षीही ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित ‘कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३’ ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील गाजलेल्या टेनिस क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मागील दोन वर्षे कोकण नाऊ प्रीमिअर लीगला तुफान प्रतिसाद मिळाला होता. यंदाही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कोकण नाऊचे संचालक विकास गावकर यांनी व्यक्त केला आहे.

बोर्डिंग मैदानावर होणारा क्रिकेटचा हा महासंग्राम “कोकण नाऊ”च्या वतीने कानाकोपऱ्यातील दर्शकांना घरबसल्या युट्यूब, फेसबुक आणि केबल चॅनेलवर पाहता येईल. सिंधुदुर्ग जिल्हयातील ही नावाजलेली व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा असून ४ कॅमेऱ्यांनी प्रेक्षकांसाठी लाईव्ह स्वरूपात प्रसारित करण्यात येणार आहे. एमसीए मान्यताप्राप्त तज्ञ पंच आणि समालोचक या स्पर्धेसाठी उपलब्ध असतील. ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असून स्पर्धेत १६ संघाना सहभागी होता येणार आहे, अशी माहिती संचालक विकास गावकर यांनी दिली. 

”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पहिले बक्षीस रोख २ लाख ५१ हजार रुपये, आकर्षक चषक तर दुसऱ्या क्रमांकासाठी रोख १ लाख २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी रोख २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक तसेच चौथ्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि आकर्षक चषक आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक ही तसेच अन्य बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघात जिल्ह्यातील तसेच अन्य राज्यातील नावाजलेले खेळाडू आपले कौशल्य दाखवतील. यामुळे “कोकण नाऊ”च्या दर्शकांसाठी ही एक विशेष पर्वणी ठरेल. मालवणच्या बोर्डिंग मैदानावर रंगणाऱ्या स्पर्धेच्या सर्व दिवसात क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते. स्पर्धेत यावर्षी सुद्धा स्थानिक तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक येथून संघ दाखल होणार आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक संघानी सहभाग दर्शवावा, असे आवाहन कोकण नाऊचे संचालक विकास गावकर आणि संचालिका वैशाली गावकर यांनी केले आहे.   

 
     
मालवणचे बोर्डिंग ग्राउंडही सज्ज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “क्रिकेटची पंढरी” म्हणून ओळखले जाणारे मालवणचे बोेडिंग मैदानही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. या मैदानावर आजपर्यंत राज्यस्तरीय स्पर्धेचे सामने पार पडलेत. तर जागतिक क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा आणि भारतीय संघातील उदयोन्मुख खेळाडू पृथ्वी शॉ यांनीही मालवणच्या या मैदानावर आपली लाजवाब खेळी साकारलीय. याच मैदानाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला क्रिकेटच्या गौरवशाली मातब्बर खेळाडू घडवलेत. या मैदानावर कोकण नाऊ च्या वतीने क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!