तारकर्ली रांजनाल्या नजिकच्या जोडरस्त्याचे काम १५ दिवसात पूर्ण करणार !
भाजपा नेते निलेश राणेंच्या दणक्यानंतर ठेकेदाराची ग्वाही ; अन्यथा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची सा. बां. अधिकाऱ्यांना सूचना
मालवण | कुणाल मांजरेकर
जागतिक पर्यटन नकाशावरील तारकर्ली गावातील रांजनाल्यावरील पूलाच्या कामाची मुदत संपूनही ठेकेदाराकडून जोडरस्त्याचे काम पूर्ण करण्यास टाळाटाळ आहे आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. हे काम तात्काळ पूर्ण करा, नाहीतर ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची सूचना निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. अखेर येत्या १५ दिवसात हे काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली आहे.
मालवण तालुक्यातील निसर्गरम्य तारकर्ली गावातील रांजनाल्यावर बरेच महिने पूलाचे चालू असलेले काम कित्येक महिने बंदच आहे. ते अपुरे स्थितीत असल्याने वाहतुकीस खोळंबा होत आहे. त्यामुळे हे काम तात्काळ होण्यासाठी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी १५ फेब्रुवारीला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी मंगळवारी अचानक याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार उपस्थित होता. यावेळी एका महिन्यात काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली. मात्र हे काम १५ दिवसांच्या आत पूर्ण झालेच पाहीजे, नाहीतर ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा, अशी सूचना निलेश राणे यांनी करत ठेकेदार आणि अधिकारी वर्गाला धारेवर धरले.
अखेर हे काम पंधरा दिवसात पूर्ण करण्याची लेखी हमी ठेकेदाराच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतचे पत्र निलेश राणे यांच्या हस्ते सुरेश बापार्डेकर यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सुदेश आचरेकर, मंदार लुडबे, आबा हडकर यांच्यासह सरपंच शीतल मयेकर, वैभव सावंत, जयवंत सावंत, महेंद्र चव्हाण, प्रफुल्ल मांजरेकर, भाई आजगावकर, गणेश आचरेकर, मोहन केळुसकर, राजू आचरेकर, देवा नेवाळकर, संदीप भोवर, अनिल झाड, शिरपुटे, चैतन्य वाककर, सागर चव्हाण, दत्तराज चव्हाण, संतोष झाड, प्रतीक झाड, गणेश आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.