काळसे ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या ; तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा

काळसे होबळीचा माळ येथे डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

मालवण | कुणाल मांजरेकर

काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पाच महिलांना मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच महिला जखमी झाल्या आहेत. या अपघातानंतर शुक्रवारी काळसे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरचा मालक जोपर्यंत मालवणात येत नाही आणि जखमी महिलांच्या उपचाराची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. हे सर्व ग्रामस्थ पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाले असून या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काळसे सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातात काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुक्मिणी विठोबा काळसेकर (५५ )) अनिता चंद्रकांत काळसेकर (५५) प्रमिला सुभाष काळसेकर (४०) प्रज्ञा दिपक काळसेकर ( ३५ ) या चौघीजणी जखमी झाल्या आहेत. जखमी महिला रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, काळसे ग्रामस्थानी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शवत डंपरचा मालक जोपर्यंत मालवणात येत नाही आणि जखमी महिलांच्या उपचाराची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!