मारहाण प्रकरणी तिघांना अटक ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांचा युक्तिवाद

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वराड कुसरवे कावलेवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी मालवण पोलिसांनी गुरुनाथ विठ्ठल पोखरणकर, स्वाती गुरुनाथ पोखरणकर आणि विठ्ठल गुरुनाथ पोखरणकर या तिघांना अटक केली. संशयिताना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी युक्तिवाद केला.

ही मारहाणीची घटना १६ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गणपत अच्युत पोखरणकर यांच्या फिर्यादी नुसार तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. मारहाणीवेळी गणपत यांची चैन हिसकावून घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!