मालवण तालुक्यातील “ड” यादीतील सर्वांचा पात्र यादीत समावेश करा

उपसभापती राजू परुळेकर यांनी वेधले लक्ष ; “त्या” ३३५३ ही जणांना लाभ देण्याची मागणी

मालवण : ज्यांचे घर मातीच्या भिंतींचे व नळे, गवत आदी छप्पर पासून बनलेले आहे. या लाभार्थ्यांना शासन निकषानुसार घर बांधणी करून मिळण्यासाठी मालवण तालुक्यात सर्व्हे करून ३,३५३ लाभार्थ्यांची ‘ड’ यादी बनवण्यात आली आहे. मात्र त्यातील १,७३६ कुटुंब पात्र ठरवण्यात आली आहेत. तरी सर्व्हे झालेल्या सर्व कुटुंबांचा पात्र लाभार्थी यादीत समावेश करावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर यांनी केली आहे. मालवण पंचायत समितीच्या आढावा सभेत त्यांनी ही मागणी केली. या मागणीला सर्वांनी पाठिंबा दर्शवला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!