भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही येणार आंगणेवाडी दौऱ्यावर ?

भाजप सूत्रांची माहिती ; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत होणार

मालवण | कुणाल मांजरेकर

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा येत्या ४ फेब्रुवारीला होत आहे. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आंगणेवाडी यात्रेला उपस्थित राहणार असल्याचे सुतोवाच भाजपच्या सूत्रांनी केले आहेत. फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जंगी स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून नियोजन केले जात आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यंदा उपस्थिती उपस्थित राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!