निवडणुका जवळ आल्या की जावकरांसारख्या बेडकांचे “डराव- डराव”

गणेश कुशेंची टीका ; रस्त्यांची कामे होण्याची माहिती मिळताच प्रसिद्धीसाठी निवेदनाची स्टंटबाजी

मालवण | कुणाल मांजरेकर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामध्ये शहरातील मेढा भागातील रस्त्यांचाही समावेश आहे. याची माहिती मिळाल्याने माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी प्रसिद्धीसाठी निवेदनाची स्टंटबाजी केली आहे. पावसाळा जवळ आला कि बेडूक ओरडायला सुरूवात करतात. त्याचप्रमाणे निवडणूका जवळ आल्या की जावकरांसारखे बेडूक जागे होतात आणि डराव डराव करून ओरडायला लागतात, अशी टीका माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी केली आहे.

श्री. जावकर हे खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू पहात आहेत. परंतू मालवणची जनता सूज्ञ आहे, हयांची नौटंकी ओळखून आहे. त्यामुळे मालवणची जनता ह्यांना भीक घालणार नाही. एखादं काम होणार आहे हे कळल्यावर केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून कामं होत नसतात, तूप खाऊन लगेच रूप कधी येत नसते. मेढा भागातील विकास कामांना चिरीमिरीसाठी खिळ घालणारे महेश जावकरच होते, हे जनता विसरलेली नाही. गेले एक वर्ष न. प. मध्ये प्रशासकिय राजवट आहे. त्यापूर्वी या रस्त्याचे काम कोणी थांबवले, हे तुमच्यासोबत असलेले मंदार केणी तुम्हाला सांगू शकतील. कारण त्यावेळी तेच बांधकाम सभापती होते. आता सिंधुदूर्गचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी सर्व रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनास दिल्याचे समजल्यामुळेच आपली आणि आपल्या नेत्यांची नाचक्की होणार म्हणून आमच्यामुळे ही कामं झाली असं दाखवण्याचा केवीलवाणा प्रयत्न हे बेडूक करत आहेत, अशी टीका कुशे यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!