कणकवली भागातील एअरटेल नेटवर्कचा प्रश्न सुटणार !

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा

कणकवली I मयुर ठाकूर :

कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती. दरम्यान, याबाबत नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधत तात्काळ टॉवर सुरू करण्याकरिता एअरटेल कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानुसार रेल्वेच्या जमिनीत असलेला टॉवर दुसरीकडे स्थलांतरित करत असताना याकरिता एका खाजगी जागेचा करार देखील करण्यात आला आहे. परंतु टॉवर स्थलांतरित करण्यास काही विलंब जाणार असल्याने या कालावधीत तात्काळ ट्रक टॉवर उभारणी करण्याची मागणी श्री. नाईक यांनी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून एअरटेल चे व्यवस्थापक नीरज मोर्ये यांच्याशी संपर्क साधून ट्रक टॉवरची मागणी मान्य झाली आहे अशी माहिती विरोधी गटनेते, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. या मागणी नंतर येत्या दोन दिवसात हा ट्रक टॉवर कणकवली बांधकरवाडीच्या ठिकाणी कार्यान्वित होणार असल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले. व त्यानंतर येथे महिन्याभरात एरटेल चा नवीन टॉवर स्थलांतरित करून कार्यान्वित होईल असेही त्यांनी सांगितले. यामुळे या भागातील नागरिकांनी एअरटेल नेटवर्क ची समस्या सुटणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!