युती शासनाचा दिलासा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मत्स्य सोसायट्यांना डिझेल परतावा ; अन्य प्रश्नही मार्गी

मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ना. रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे मच्छीमारांनी मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्यविकास सोसायट्यांना भाजपा – शिंदे सरकारने दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील सोसायट्यांना यापूर्वी हक्काच्या डिझेल परताव्यासाठी शासनाकडे हाजी हाजी करावे लागत होते. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील सोसायट्यांचा सर्व परतावा अदा केला आहे. याबाबत मच्छीमारांच्या वतीने माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, नारायण धुरी, वसंत गावकर यांनी आभार मानले आहेत.

भाजपा शिंदे गटाचे युती सरकार महाराष्ट्रात आल्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती. यावेळी आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्येबाबत पाढा वाचला होता .केंद्रातील मत्स्य संपदा योजना सक्षमपणे जिल्ह्यात न राबविणे, त्यात राजकीय हस्तक्षेप करणे, डिझेल परतावा न मिळणे, सागर मित्र यांची नेमणूक न करणे, वादळातील मिळालेल्या नुकसान भरपाईत पक्षपात करणे असे प्रकार पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या अनुसरून पालकमंत्री यांनी मंत्रालयामध्ये मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. त्यावेळी डिझेल परतावा वेळेवर न मिळाल्यास सोसायटीचे व मच्छीमारांचे होणारे नुकसान या संदर्भात निलेश राणे यांनी स्पष्टता केली होती. निपक्षपणे हाजी हाजी व भीक मागण्यासारखे परतावा न देता भरघोस परतावा व संपूर्ण परतावा द्यावा अशी मागणी केली होती. त्या अनुसरून सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ डिझेल परतावा दिला. त्याचबरोबर केंद्रातील मत्स्य संपदा योजना जिल्ह्यात सक्षमपणे राबवण्यासाठी सागर मित्र नेमणूक करणे आवश्यक आहे अशी मागणी केली होती. त्यास अनुसरून जिल्ह्यामध्ये दहा सागरमित्रांची नेमणूक, कायमस्वरूपी सहाय्यक आयुक्तची पण नेमणूक तात्काळ करण्यात आली आहे. तसेच समुद्र गस्तीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून कार्यान्वित करण्यात आली आहे. भाजपा शिदे सरकारमुळे प्रशासन कसे गतिमान झाले आहे याचीही प्रचिती जनतेला येत आहे. मच्छीमारांच्या प्रश्नाकडे युती सरकार गांभीर्याने पाहत आहे.

आघाडी सरकारवेळी हक्काचे पैसे भीक मागल्यासारखा निधी मागावा लागत होता आणि सरकार उपकार करते अशा हमीभावात पक्षपात करून निधी देत होता. याचीच प्रसिद्धी घेण्याचे काम स्थानिक आमदार करत होते. मत्स्य संपदा योजनेतील व चांदा ते बांदा, सिंधू रत्न योजनेतील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर कार्यवाहीत होण्यासाठी निलेश राणे यांच्यामार्फत भाजपा कार्यरत असून मच्छीमार व मच्छीमार सोसायटीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहे. डिझेल परताव्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल व सागर मित्र याची नेमणूक केल्याबद्दल मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे यांचे आभार मानण्यात येत असल्याचे माजी नगराध्यक्ष अशोक तोडकर, बूथप्रमुख नारायण धुरी,वसंत गावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!