दांडेश्वर मंदिरातील रक्तदान शिबिरात ५० जणांनी केले रक्तदान
दांडी गाव आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणच्या वतीने आयोजन….
मालवण : श्री देव दांडेश्वर जत्रेचे औचित्य साधून दांडी गाव आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणच्या वतीने दांडेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले.
शिबिरात सौ. शीतल रोगे व नूतन रोगे या दाम्पत्याने एकत्रित रक्तदान केले. या शिबिरास आम. वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. रक्तदान चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या स्व. आतू फर्नांडिस यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मच्छीमार लढ्यात पत्रकारितेतून योगदान दिल्याबद्दल पत्रकार संदीप बोडवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सन्मेश परब, अन्वय प्रभू, राका रोगे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुकाध्यक्ष सौ. शिल्पा खोत, निलेश कांदळगावकर, जगदीश खराडे, मंदार केणी, बाबी जोगी, जीवन भगत, हेमंत जोशी, अन्वेषा आचरेकर, मृणाली कोयंडे, रुपेश प्रभू, महेंद्र पराडकर, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर, कौस्तुभ मालंडकर, कौशल पराडकर, भाई जाधव, डॉ. शिल्पा झांटये, साक्षी मयेकर शांती तोंडवळकर, सायली कांबळी, स्वाती तांडेल, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, डॉ. सिमिली, स्टाफ नर्स परब, रक्त पेढी तंत्रज्ञ पाटील व मयुरी शिंदे, नंदकुमार आडकर, नितीन गावकर आदी उपस्थित होते.