भाजप युती सरकारच्या माध्यमातून वाळू व्यवसायाला दिलासा !

धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंसह राजन तेली यांचा पाठपुरावा

मालवण : कुणाल मांजरेकर

सर्वसामान्यांचे घर बांधणी असो अथवा कोणतेही बांधकाम असो वाळू हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. वाळू उत्खननास असणारी परवानगी ठाकरे आघाडी सरकार पासून वेळकाढू धोरणातून प्रशासन स्तरावरून संथ गतीने होत असल्याने वाळू प्रश्न गंभीर होता. मात्र यावर्षी सर्व प्रक्रिया गतिमान करत वाळू परवाने लवकर उपलब्ध होणेबाबत भाजप युती सरकारने पुढाकार घेतला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने वाळू उपसा परवानगी दिली आहे. सर्वसामान्य नागरिक, बांधकाम क्षेत्र व त्यावर अवलंबून असणारे कामगार यांना दिलासा मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

वाळू उत्खननास प्रशासकीय स्तरावरून लवकर परवानगी मिळावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्याच माध्यमातून हा प्रश्न निकाली निघाला आहे. असे सांगत धोंडी चिंदरकर यांनी जिल्हा प्रशासनाचेही आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!