कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात

नवी मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१२/२०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत छाननी दरम्यान एकूण १३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष, घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष, बळीराम परशुराम म्हात्रे, अपक्ष, बाळाराम गणपत पाटील, अपक्ष, ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे, अपक्ष, या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जागे घेतले आहेत. वर नमूद पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या आठ झाली आहे. यामध्ये म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु, भारतीय जनता पार्टी, धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), उस्मान इब्राहिम रोहेकर, अपक्ष, तुषार वसंतराव भालेराव,अपक्ष, देवरुखकर रमेश नामदेव, अपक्ष, बाळाराम दत्तात्रय पाटील, अपक्ष, प्रा.सोनवणे राजेश संभाजी, अपक्ष, संतोष मोतीराम डामसे, अपक्ष यांचा समावेश आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!