सामाजिक कार्यकर्ते आतू फर्नांडिस यांचे आकस्मिक निधन ; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

मालवण : मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते, रक्तदान चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि युवासेना उपतालुकाप्रमुख अंतोन उर्फ आतू जॉन फर्नांडिस (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने बेळगाव येथील रुग्णालयात आज दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने मालवणात हळहळ व्यक्त होत आहे.

आतू फर्नांडिस हे सामाजिक कार्यासह रक्तदान चळवळीत सक्रिय सहभागी होते. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. अल्पशा आजाराने त्यांच्यावर गेले १५ दिवस बेळगाव येथे उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या रविवारी सकाळी १० वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!