कोळंब मधील कथित शाखाप्रमुखाच्या भाजपा प्रवेशाची “पोलखोल”

शिवसेना ठाकरे गटाकडून पर्दाफाश ; तो शाखाप्रमुख नव्हेच

मालवण | कुणाल मांजरेकर

कोळंब गावाच्या कथित शाखाप्रमुखाच्या भाजपा प्रवेशाची शिवसेना ठाकरे गटाने पोलखोल केली आहे. भाजपात प्रवेश केलेले हनु धुरी हे शाखाप्रमुख नसून उपशाखाप्रमुख होते, कुणाच्यातरी वैयक्तीक अडचणींचा फायदा घेऊन त्याला आर्थिक रसद पुरवून आपल्याकडे घेणे हा भाजपचा पहिल्यापासून डाव आहे. त्यामुळे हनु धुरी यांचा कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश हा खोटा प्रकारही भाजपने केला आहे. मी शशांक चंद्रकांत धुरी २०१८ पासून कातवड कोळंब शिवसेना शाखाप्रमुख पदावर आहे, अशी माहिती शशांक धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

हनु धुरी यांच्यासोबत ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपने दाखवला ते पूर्वीपासून भाजप सोबत होते. असेही शशांक धुरी यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!