मालवण मधील शस्त्रक्रिया शिबीराला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्या सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत पुन्हा आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून आणि समर्थ बिल्डर आणि डेव्हलपर्सच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात १५ आणि १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया शिबीरात पहिल्या दिवशी रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारपर्यंत ५० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत हे शिबीर सुरु राहणार असून या शिबिरात अल्प दरात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केले आहे.

या शिबिरात श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित भ.क.ल. वालावलकर रुग्णालय व संलग्नित ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालया मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपस्थिती दर्शवली. यामध्ये डॉ. अभिजित भोसीकर, डॉ. सुयश इंगळे, डॉ. मुदस्सर शेख, डॉ. संतोष देवकाते, डॉ. सौरभ दंताळ, डॉ. ऋषिकेश पोटे यांचा समावेश आहे.

शिबिराच्या उदघाटन प्रसंगी माजी नगरसेवक दीपक पाटकर, सौ. ममता वराडकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप पळसंबकर, सौ. स्मृती कांदळगावकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, भाई मांजरेकर, आबा हडकर, भाई सारंग ( समर्थ बिल्डर आणि डेव्हलपर्स), समीर मालवणकर, पंकज गावडे, निनाद बादेकर, शुभम लुडबे, वैशिक खवणेकर, बाबू धुरी, मोहन वराडकर, राज कांदळकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिरात हृदयविकार रुग्णांची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, झडपा बदलणे, युरोलॉजी मध्ये मुतखडे व प्रोटेस्ट ग्रंथी, मूत्रविकार शस्त्रक्रिया होणार आहेत. अस्थिरोग रुग्णांच्या मणक्या वरील शस्त्रक्रिया (ओपन किंवा दुर्बीणीद्वारे), गुडग्यावरील व खुबा शस्त्रक्रिया उदा. ऑथ्रोस्कोपी, सांधा बदलणे शस्त्रक्रिया होणार आहेत. तसेच मोतीबिंदू आणि कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, टॉन्सिल शस्त्रक्रिया, कानाच्या शस्त्रक्रिया, रक्त वाहिन्यामधील दोष व अडचणी तपासणी, अपेंडीस, थायरॉईड, अल्सर, आतड्यांवरील स्वादुपिंडा वरील सर्व जनरल सर्जरी याठिकाणी होणार आहेत. या शस्त्रक्रिया अल्प दरात होणार असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांनी केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. त्यांचा आजार योजने अंतर्गत समाविष्ट असल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा त्यांना लाभ मिळणार आहे. सर्व रुग्णांची कोरोना प्राथमिक आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
गरजू रुग्णांनी येताना जुने रिपोर्ट सोबत आणावेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी माजी नगरसेवक दीपक पाटकर 9422584073, मंदार लुडबे 9595009110, स्मृती कांदळगावकर 9422633745, माजी नगरसेविका ममता वराडकर 8208454975, ललित चव्हाण 9096728048 किंवा राजू बिडये 9422392628 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!