विनयभंग प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल ; वराड येथील घटना

मालवण : १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी विशाल विजय आसोलकर (वय – १९, रा. वराड भंडारवाडी, ता. मालवण ) याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादीच्या घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन संशयिताने घरात प्रवेश करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची फिर्याद सदरील मुलीने पोलीस ठाण्यात दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!