मालवणात १५, १६ जानेवारीला शस्त्रक्रिया शिबीर

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पुढाकार ; समर्थ बिल्डरचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून मालवण ग्रामीण रुग्णालयात १५ आणि १६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत विविध आजारांवर शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अल्प दरात शस्त्रक्रिया होणार आहेत. समर्थ बिल्डर आणि डेव्हलपर्सने हे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित भ.क.ल. वालावलकर रुग्णालय व संलग्नित ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयामार्फत या शस्त्रक्रिया होणार आहेत.

या शिबिरात हृदयविकार रुग्णांची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, झडपा बदलणे, युरोलॉजी मध्ये मुतखडे व प्रोटेस्ट ग्रंथी, मूत्रविकार शस्त्रक्रिया होणार आहेत. अस्थिरोग रुग्णांच्या मणक्या वरील शस्त्रक्रिया (ओपन किंवा दुर्बीणीद्वारे), गुडग्यावरील व खुबा शस्त्रक्रिया उदा. ऑथ्रोस्कोपी, सांधा बदलणे शस्त्रक्रिया होणार आहेत.

तसेच मोतीबिंदू आणि कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, टॉन्सिल शस्त्रक्रिया, कानाच्या शस्त्रक्रिया, रक्त वाहिन्यामधील दोष व अडचणी तपासणी, अपेंडीस, थायरॉईड, अल्सर, आतड्यांवरील स्वादुपिंडा वरील सर्व जनरल सर्जरी याठिकाणी होणार आहेत. या शस्त्रक्रिया अल्प दरात होणार असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांनी केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. त्यांचा आजार योजने अंतर्गत समाविष्ट असल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा त्यांना लाभ मिळणार आहे. सर्व रुग्णांची कोरोना प्राथमिक आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
गरजू रुग्णांनी येताना जुने रिपोर्ट सोबत आणावेत.

तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी माजी नगरसेवक दीपक पाटकर 9422584073, मंदार लुडबे 9595009110, स्मृती कांदळगावकर 9422633745, माजी नगरसेविका ममता वराडकर 8208454975, ललित चव्हाण 9096728048 किंवा राजू बिडये 9422392628 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले.आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!