मालवणात भाजपाकडून अजित पवारांचा निषेध !
मालवण : संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मालवणात भाजपने निषेध केला. तसेच धर्मवीर संभाजी महाराजांचा जयघोष यावेळी करण्यात आला.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसत आहेत. राज्याभरात अनेक ठिकाणी पवार पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मालवणातही भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी लोकसभा मतदार संघाचे संयोजक अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, प्रमोद करलकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, महेश सारंग, ललित चव्हाण, सुशांत घाडीगांवकर, अजिंक्य पाताडे, आशिष हडकर, यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.