सुकळवाड मध्ये ठाकरे गटाकडून कॉमेडीची “हास्यजत्रा” !

आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवून सुकळवाड शिवसेनामय झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न : अजिंक्य पाताडे यांची टीका

मालवण | कुणाल मांजरेकर

सुकळवाड मधील कथित भाजपा कार्यकर्ते देवेंद्र पाताडे यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवेशावरून भाजप नेते, माजी पं. स. सभापती अजिंक्य पाताडे यांनी सेनेवर टीका केली आहे. सुकळवाड मध्ये ठाकरे गटाकडून कॉमेडीची “हास्यजत्रा” सुरु आहे. स्वतःच्याच पक्षातीलच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवून सुकळवाड शिवसेनामय झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका अजिंक्य पाताडे यांनी केली आहे.

शिवसेनेकडे कार्यकर्ते शिल्लक राहिले नसल्याने आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवून शेखी मिरवली जात आहे, असे सांगून सुकळवाडमध्ये शिवसेनेकडून अधिकृत सरपंच पदाची उमेदवारी लढविलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या घरातील मंडळी यांचे प्रवेश दाखवून शिवसेनेने कॉमेडीची हास्यजत्रा चालवली आहे. सुकळवाड गाव पूर्ण भाजपमय झाल्याने आता काहीतरी वळवळ करायची म्हणून आपल्याच पक्षातील कार्यकर्ते यांचे प्रवेश दाखवून आपलीच पाठ थोपटून घेत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सपाटून मार खालेल्या शिवसेनेत आता भविष्यात कोण शिल्लक राहतील ते पाहावे असेही अजिंक्य पाताडे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!