लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे ग्लोबल रक्तदाते मालवण संघटक अमेय देसाई सन्मानित

रक्तदान क्षेत्रात नि:स्वार्थपणे सेवा बजावल्या बद्दल सन्मान

मालवण : लायन्स क्लब ऑफ मालवणचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (प्रांतपाल) अधिकृत भेट कार्यक्रम काळबादेवी एक्झॉटीका (कुरण) चिवला बीच धुरीवाडा मालवण येथे पार पडला. यावेळी रक्तदान क्षेत्रात नि:स्वार्थपणे सेवा बजावणारे ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग संघटक अमेय देसाई यांचा लायन्स क्लब ऑफ मालवण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (प्रांतपाल) एम.जे.एफ. राजशेखर कापसे यांच्या हस्ते शालश्रीफळ व प्रमाणत देऊन सन्मानित करण्यात आले. अमेय देसाई व सौ. ऋतुजा अमेय देसाई यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला.

अमेय यानी हा सन्मान रक्तदान सेवा बजावणाऱ्या सर्व निस्वार्थ रक्तदात्याना समर्पित केला. आणि लायन्स क्लब ऑफ मालवणचे आभार व्यक्त केले. यावेळी ग्लोबल रक्तदाते मालवण संघटक राजा शंकरदास, विकास पांचाळ, संदीप पेडणेकर, हेमंत रामाडे, अंतोन काळसेकर, संतोष मांणगावकर, वैभव मेस्त्री, विघ्नेश मांजरेकर आदी ग्लोबल रक्तदाते परिवार उपस्थित होता. लायन्स क्लब ऑफ मालवण तर्फे डिस्टिक गव्हर्नर (प्रांतपाल) एमजेएफ लायन राजशेखर कापसे, लायन्स क्लब मालवण अध्यक्ष ला. वैशाली शंकरदास, सचिव ला. अनुष्का चव्हाण, खजिनदार ला. अंजली आचरेकर, ला. वैशाली कापसे, ला. गणेश प्रभुलकर, ला. उदय घाटवळ, ला. मुकेश बावकर, ला. शांती पटेल आदी क्लबचे सभासद उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!